रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२

---|| संभाजींच्या मातोश्री - सईबाई ||----

सईबाई भोसले (निंबाळकर) (मृत्यू :- ५ सप्टेंबर १६५९.)

छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी. धर्मवीर संभाजी राजांच्या मातोश्री.


जिजाऊ मातोश्रींची सर्वात प्रिय व संस्कार प्रिय सून .

सईबाई या छत्रपती संभाजी राजांच्या आई होत्या ,
परंतु संभू राजे लहान असतानाच सईबाईंचा मृत्यू झाला.

सईबाईंचे वडील माधोजीराव निंबाळकर होते.
छत्रपती शिवरायांबरोबर सईबाईंचा विवाह झाला
तेंव्हा त्या फक्त ७ वर्ष्याचा होत्या आणि शिवराय ११ वर्ष्यांचे होते.
त्यांच्या चेहऱ्याचा रंग गव्हाळ होता .
त्या शिवरायांच्या स्फूर्तीस्थान आणि सामर्थ्यवान अश्या पत्नीहोत्या.

त्यांच्या मृत्युनंतर शिवरायांना त्यांची भरपूर उणीव भासली .
संभू राजांना पाहताना शिवरायान पुढे सईबाईंची आभास मूर्ती उभी राहत असे .

मृत्यू समयी शिवरायांच्या तोंडून शेवटचा शब्द "सई" निघाला होता.
सईबाईंना संभाजींच्या अगोदर तीन मुली होत्या .

त्यातील एका कन्येचा (" सखुबाई") विवाह सईबाईंच्या भावाचा मुलगा बजाजी नाईक निंबाळकर यांच्याशी झाला .

संभाजींचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती, संभू राजे २ वर्ष्यांचे असतानाच आपल्या मातोश्रीनपासून दुरावले होते. पुढे संभू राजांना त्यांच्या आज्जी व शिरायांच्या मातोश्री " जिजाउंनी " घडवले.

-|| बजाजी निंबाळकरांचे धर्मांतर – एक दंतकथा ! ||-

शिवकालात फलटण संस्थान हे मोठे मातब्बर.ह्या संस्थानाचे शिवकाळातील अधिपती बजाजीराजे नाईक निंबाळकर हे तो शिवाजी महाराजांचे व्याही. फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांच्यासबंधी एक प्रसिद्ध दंतकथा आहे. ती अशी की -

“विजापुरच्या आदिलशहाने त्यास विजापुरला धरून नेले व त्याचे धर्मांतर केले, नंतर ते देशी परतले व आपल्या केलेल्या कर्मांचा त्याना पश्चाताप झाला, बजाजीराव ह्यांची छत्रपती शिवाजी महाराजानी शिखर शिंगणापूर येथे शुद्धि करून घेतली, त्यानंतर काही दिवसानी बजाजीचा मुलगा महादजी निंबाळकर यास शिवाजी महाराजानी आपली मुलगी दिली.”

सत्य असे की धर्मांतर झाले असा कुठेही उल्लेख नाही आणि जर बजाजीराव यांचे धर्मांतर झालेच असेल तर मग त्यांचे ” मुसलमान “ नाव काय ?

हे आजतागायत कोणीही देत नाही. या कथेचा उल्लेख करताना कुठलीच तारीख – शक – संवत्सर काही सुद्धा आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही. दंतकथाकार कथेत बजाजीराजे हे १६४२ मधे मुसलमान झाले असे म्हणतात, त्या हिशोबे त्याचे १६४२ ते १६५१ या कालखंडामध्ये जर धर्मांतर झाले असेल तर त्यांचा कागदोपत्री उल्लेख हा मुसलमान नावाने यायला हवा, पण तो येत नाहीच तर याच दरम्यान त्यांचा उल्लेख हा हिन्दू म्हणूनच केला जातोय, ते ही चक्क समकालीन कागद पत्रामंधे, पाहूया जरा हे समकालीन पुरावे -

१) शिवभारत हे अस्सल साधन आज उपलब्ध आहे, पहिले त्याचा संदर्भ पाहूया -
शिवभारत – अध्याय १३- श्लोक १०
घांटीको (घाटगे) मत्तराजश्च कुलीशोपमसायक: |
तथा फलस्थान (फलटण) पतिबलवान बाजनायक: ||

या मधे कविन्द्र परमानंद हे बजाजीराजेंचा उल्लेख ” बाजनायक ” असा करतात, शिवभारता मधे येणारा हा उल्लेख १६४८ मधल्या प्रसंगाचा आहे जेव्हा स्वराज्यावर फतहखानाचे संकट आले आहे. कविन्द्र परमानंद यांनी बजाजीस फलटणचा अधिपती आणि बाजनायक असे म्हटले आहे, श्लोकामध्ये जर बजाजीराजांचे धर्मांतर झाले असेल तर त्यांच्या यावनी नामाचा उल्लेख अजिबात नाही, शिवभारत हे विश्वासार्ह आहे कारण ते समकालीन आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे क्रमप्राप्त आहे.कविन्द्र परमानंद हे महाराजांचा निकटवर्तीय आहेत.तेव्हा हा पुरावा निश्चित विश्वासपात्र आहे. 
२) एक छोटी कैफियत आहे निंबाळकर घराण्याची जी १८२२ मधे लिहली गेली, ती बापूसाहेब निंबाळकर यांच्या दफ्तरात सापडली, त्यात एक उल्लेख आहे की बजाजीरावांनी १६५१ मधे बेगम (विजापूरची बडी बेगम ?) हिच्याकडून फलटणची सनद घेतली.इथेही बजाजीरावांचे नाव हिंदूच तसेच त्यांच्या धर्मांतराचा काहीही उल्लेख नाही.

३) बजाजीराजे निंबाळकर १६५९ मधे अफजलखान स्वारीच्या वेळी फलटण मधे होते, त्यास अफजलखान याने पकडले व त्याची सुंता करून ठार मारण्याची धमकी दिली त्यावेळी अफजलखानाकडील मराठी सरदार ” नाइकजीराजे पांढरे ” यांच्या मध्यस्थिने बजाजीराजे निंबाळकर यांच्याकडून ६० हजार होनांची खंडणी घेउन अफजलखानाने त्यांना सोडले.

ह्या संदर्भातील अस्सल पत्र खाली देत आहोत -

” धनकोनाम जयचंदीभाई व जमामाव बाबानभाई मुक्काम मलवडी यास रिणकोनाम बजाजी नाइक निंबाळकर व सावित्रीबाई महादजी नाइक निंबाळकर देशमुख परगणे फलटण…कारणे लिहून दिला कर्जकतबा ऐसाजे बदल खान आजम आबदलाखान ( अफजलखान ) यासी पातशहानी साहेबी शिवाजी राजेवारी मसलत केलि. ते वख्ति आबदलाखान कुचावर कुच करून मलवडी उतरले, ते वख्ति अम्हाबद्दल शिवाजी राजे यानि नाइकजी राजेस ( नाइकजीराजे पांढरे) बहुत प्रकारे कागद लिहला होता आम्हास दस्त करून गल्यात तोफ घालून सुनता करून हत्तीच्या पायाखाले घालून मारावे, तो नाइकजी राजे यांनी बहुत काही आडमुड होउन आबदलाखानास अर्ज केल्यावरी साठी हजरावारी करार करून, होन साठी हजारावर दरम्यान नाइकजी राजे पांढरे जमान होउन सोडिवले

साक्षीदार – रतनजी माने देशमुख कसबे मह्सवड, मलजी राजे पांढरे, रविराव ढ़ोणे, जाधवराव देशमुख दौलताबाद, धूलाजी राजे सडगे, देवजी राजे धायगुड़े, तानाजी राजे काकरे, दत्ताजी माने देशमुख कर्यात मलवडी, विठ्ठल भालेरावजी दीवाण निरत नाइकजी राजे पांढरे ”
( शिवकालीन पत्रसारसंग्रह – खंड – २ – लेख.क्र. – १७९७ )

जर इ. स . १६५९ मधे अफजलखान बजाजीराजे नाइक यांची सुनता करायची धमकी देतो तर ह्यावरून काय सिद्ध होते की – १६५९ च्या अगोदर बजाजी निंबाळकर यांची सुनता झालीच नव्हती, कारण जर ती झालेली असती तर अफजलखानाने तशी धमकी बजाजीस दिलीच नसती.

सारांश बजाजीराजे निंबाळकर हे मुसलमान झाले होते ह्या विधानाला काहीही पुरावा नाही.

|| लेखन सीमा ||

                                                                                       --|| विशाल खुळे  ||--

संदर्भ : http://raigad.wordpress.com या ब्लॉग वरून

माळशिरस येथील सखुबाई महादजी निंबाळकर यांची दुर्लक्षित भग्न समाधी

 अकलूजचे अविनाश जाधव यांनी ओर्कुटवरती  लिहिलेल्लीहिलेला लेख
२४ सप्टेंबरला मी सत्यशोधक समाज्याच्या १३७ व्या वर्धापन दिनासाठी " महात्मा फुलेवाडा , पुणे " येथे सत्यशोधक समाज्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो...
तेथे बाबा आढाव यांनी " पुरोगामी सत्यशोधक " हे त्रेमासीख प्रकाशित केले त्यात अकलूज येथील सखुबाई ( सकवार ) महादजी निंबाळकर यांची भग्न समाधी बाबत प्रबोधन पर लेख होता या अंकाचे मुखपृष्ठच या समाधीच्या फोटोने आहे..



बाबांनी ( बाबा आढाव ) सखुबाई महादजी निंबाळकर यांचा इतिहास सांगितला .... हा इतिहास आणि ती भग्न समाधी पाहून मन सुन्न झाले..

प्रथमच मराठा असल्याची लाज वाटली...

त्या नंतर अंकाच्या चार प्रती घेऊन घरी गेलो... झोप काही लागली नाही...

अकलूजचे जेष्ठ नेते मोहिते पाटील यांना पत्र लिहिले...
पण राजकीय परिस्थिती पाहता हे काम सामाजिक लोकांनाच करावे लागेल हे लक्षात आले...

चार दोन थोरा मोठ्यांना भेटलो... पण त्यांना इतर बरेच व्याप असल्याने .. फार कोणी काळजी पूर्वक लक्ष दिले नाही ...!!!!!!

बाबा आढावाना पुन्हा व्यक्तीशः भेटायचे ठरवले..
बाबा आढावानी आनदाने पाठींबा दिला ....

तुम्ही तरुण मंडलीनीच हे काम आता पाहायला हवे " अकलूज परिसरातील सर्व सामाजिक शिवप्रेमींना एकत्र करून या दुर्लक्षित शिवकन्येच्या समाधीचा जीर्णोद्धार करा... मी सोबत आहेच .. " असा मोलाचा पाठींबा त्यांनी दिला...

त्या नंतर शाहीर राजेंद्र कांबळे यांची भेट घेतली त्यांनी हि पुढाकार घेण्याचा शब्द दिला...
पंढरपुरचे युवानेते अमरजित पाटील यांनीही सक्रीय पाठींबा दिला आहे.

या नंतर या समाधीचे संशोधक गोपाळराव देशमुख यांना त्यांचे पंढरपुरचे घरी भेटायला गेलो त्यांनी फारच तळमळीने सारी माहिती दिली....

ती मी येथे लिहिणार आहेच ...

 या नंतर मी फलटणच्या शाही समाधीला भेट दिली आणि माळशिरसला जाऊन सखुबाई महादजी निंबाळकर यांची दुर्लक्षित भग्न समाधी हि पहिली..


एकीकडे संगमरवरी शाही निंबालकरी समाध्या आणि दुसरीकडे त्याच घरात दिलेल्या शिवकन्या सखुबाई निंबाळकर यांची भग्न समाधी पाहून


आज हि ब्राह्मणी मानसिकता मराठा समाज्याच्या ऐतिहासिक वारशांचे किती नुकसान करत आहे याची तीव्र जाणीव झाली..
.
या सामाजिक क्रांतीला दडपण्यासाठी त्या समाधीला वाळीत टाकावे !!!!!!!!!!!!!! एवढे दुर्लक्षित करावे कि तेथे अक्षरशः हागणदारी व्हावी !!!!!!!!!!!!!!!!!


वेड्या बाबळीने वेढलेल्या या जेष्ठ शिवकन्येच्या समाधीचा जीर्णोद्धार झालाच पाहिजे .......


हा ऐतिहासिक वारसा असा भग्न होत असताना आपण शिवप्रेमी गप्प बसूच कसे शकतो ????????????


या वेड्या बाबळीने वेढलेल्या भग्न समाधीचा एकही काटा जर आमच्या मनाला टोचत नसेल तर आमची मने पुन्हा एकदा तपासावी लागतील...

आपण काय करू शकतो......

१. आधी येथे प्रातःविधीला बसणाऱ्या लोकांचे प्रबोधन करावे लागेल कि बाबानो हे थांबवा ...
२. या साठी प्रथम त्या जागेच्या मालकांना या समाधीचे महत्व पटून द्यावे लागेल ते काम मी १५ डिसेंबर नंतर करणार आहे..
३. जागेचे मालक हे शिव प्रेमी तसेच सामाजिक जाणीव असणारे आहेत त्या मुळे फार त्रास होणार नाही अशी अपेक्षा आहे.
४. या नंतर त्या जागेवर तर काम्पौंद करावे लागेल आणि एक मोठा माहिती फलक लावावा लागेल..
५. छोटासा प्रबोधन पर कार्यक्रम ठेवावा लागेल.... जन जागृती करावी लागेल..
६. त्या नंतर या जागेची स्वच्छता करावी लागेल.
७. या नंतर जीर्णोद्धारासाठी निधी उभारावा लागेल...
८. येथून पुढे जीर्णोद्धाराची खरी सुरुवाट होईल....

यासाठी समाधी परिसरातील शिवप्रेमींना सहभागी होण्यासाठी प्रबोधन करायचे आहे ते मी करत आहेच ....

संदर्भ  : http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=12792978&tid=5540033853785670369&start=1 
----------|| शिवपुत्र संभाजी राजे ||--------------
कितीही आली संकटे ,
तटस्तपने लढू ,
छत्रपती शिवरायांच्या या
पावन शिवभूमीत,
शंभू राजांप्रमाणे घडू .
शिवचरित्रा मधून संस्कार,
देवू नव्या पिढीला ,
घडवू प्रत्येक मावळा ,
शंभू चरित्रातून .
---|| शंभू राजांना त्रिवार मुजरा ||---
===========================================


------------------|| राजे ||------------------------
--------|| होय आम्ही अजुन जिवंत आहोत ||-----------
"आचार, विचारातुनी अजूनही जपतो आमचा मराठी बाणा,
अजूनही जिवंत आहेत अमुच्या पुर्वज्यांच्या पाउलखुणा."
========================================
===